Yuva Shibir

View Images 

चर्मकार समाजाच्या मुला मुलींनी यूपीएससी एमपीएससी मध्ये आपले करिअर करावे - डॅा.किरण जाधव (आय पी एस)
चर्मकार मंच ठाणे व पालघर जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक ४जून रोजी 'घे भरारी'हे चर्मकार समाजाच्या युवा- युवाती करिता एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर,वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे,रेणुका विद्यालय झिडके,अंबाडी येथे संपन्न झाले.पालघर जिल्ह्यांतील ४५०पेक्षा जास्त युव-युवती सहभागी झाले होते.शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून राज्य आयुक्त लोकसेवा आयोग व सेवानिवृत्त आयपीएस डॉ.किरण जाधव,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित जलतरणपटू शुभम वनमाळी,ॲड.अक्षता संकेत जाधव एमबी,एलएलएम,मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भगीरथ भोईर व ॲड राजाराम मुकणे हे समाजातीलच मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात पाहुण्यांचे हस्ते करण्यांत आली व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला,प्रास्ताविकात चर्मकार मंचाचे अध्यक्ष श्री संदेश जाधव यांनी मंचाची वाटचाल,समाजाची शैक्षणिक प्रगती व शिबीराचा उद्देश कथन केले. देवव्रत विवेक वाळींजकर हे मुख्य मानव संसाधन अधिकारी - ग्रोथ, केर्न ऑइल अँड गॅस, वेदांत लि. भारतातील 30 एचआर लीडर म्हणून ओळखले गेलेले देवव्रतने IIM ,MBA,IIT मेटलर्जिकल आणि मटेरियल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीसह पदवी प्राप्त केल्या बद्दल व राज्यस्तरिय क्रिडा स्पर्धा विजेता संस्कार महेश जाधव यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यांत आला.
डॅा.किरण जाधव (IPS) यांनी विद्यार्थ्यांनी आपला कल कुठल्या विषयाकडे आहे हे बघतच आपले क्षेत्र निवडावे व संपूर्ण आत्मविश्वासाने व जिद्दीने आपले करिअर पूर्ण करावे असे सांगत यूपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये चर्मकार समाजातील मुला-मुलींनी आपले करिअर करावे व त्यासाठी यूपीएससी परीक्षेस सामोरे जाताना काय करावे लागते यासंबंधीची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.ॲड.अक्षता संकेत जाधव यांनी तंत्रज्ञान पदवी प्राप्त करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करताना त्यांना आलेल्या अडचणीवर मात कशी करावी त्याचप्रमाणे परदेशातून प्रोजेक्ट मॅनेजमेंट एमबीए पदवी,मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी ,एल.एल.एम करण्याचे आपले अनुभव त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले.
जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी आपल्या विक्रमा बाबत जीवनातील खडतर प्रवास व जलतरंगपट्टू म्हणून यशा मागील श्रमाची रोमांचक माहिती त्यांनी कथन केली. श्री दीपक खांबीत यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधींचा आलेख मांडला व भगिरथ भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केल.दुपारच्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.अदिती साकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ट्रेस,मानसिक तणाव कसा हाताळावा व आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्या विषयीचे उद्बोधक मार्गदर्शन केले.सर्वदा प्रतिष्ठानचे अमित पटेल यांनी व्यसनमुक्ती व एड्स जन-जागरण संबंधीची आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच सुधीर वनमाळी यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय योजनांची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली व संबंधीत पुस्तिका देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली.सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना ऑडिओ विज्युअल च्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीतून सर्वोच्च करिअर घडवलेल्या व्यक्तींची उदाहरणे देत जीवनात यशस्वी होण्यासाठीची 'घे भरारी'अत्यंत उपयुक्त माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम सहभागी युवा- युवतीने सादर केले संयोजक संतोष पांडुरंग जाधव यांनी समाजातील कलावंतांच्या लोककलेचा नृत्याविष्कार सादर करून उपस्थित मनोरंजन केले.शिबिराचे आयोजन चर्मकार मंचाचे अध्यक्ष संदेश जाधव यांच्या मार्गदर्शनात सर्वच कार्यकारिणी सदस्यांच्या अपार मेहनतीने यशस्वी करण्यांत आला ,सुत्रसंचलन सुभाष पाटील,आभार प्रदर्शन संदिप राऊत यांनी केल.

संत रोहीदास समाजगृह , विक्रमगड
Blood Donation Camp Umroli
JESTHA NAGRIK JAWHAR
CHARMAKAR MANCH AGM SUM
MAHILA MELAVA DAHANU
MEDICAL CAMP UMROLI
Annual General Meeting
Event Gallery Timeline
First Committees Work Review