Who We Are
चर्मकार मंच जिल्हा ठाणे पालघर नोंदणी क्र. महा/९४९/२००१/ठाणे / एफ-९९६४-ठाणे/२००२ ६, साई कुटीर, नवयुग नगर, दिवाणमान, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर - ४०१२०२
सामाजिक संघटन व जागृती निर्माण करून गरजूंना सहाय्य करणे हा उद्देश घेऊन संस्थेच्या कार्यक्षेत्रातील, सर्व शहरातील गावांत व ग्रामीण भागात रहिवासी असलेल्या किंवा नोकरीधंद्यानिमित्त मुंबई शहर उपनगरे व इतरत्र कोणत्याही जिल्ह्यांत निवास केलेल्या विशेषतः चर्मकार (चांभार) समाजातील बांधवांना संघटित करून एकमेकांसाठी पूरक असे विधायक कार्य करण्यासाठी व विशेषतः दारिद्र्यात जीवन व्यतीत करणार्या दलितांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना विविध कामाचे सहाय्य करणे, तसेच दलितांना विशेषतः तरुण पिढीस समाजाच्या विधायक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे व संस्थेत सहभागी करून घेणे.
ज्ञाती संस्थांमध्ये समन्वय घडवून आणणे, विधायक कार्याचे व्यासपीठाद्वारे कार्य करणे, सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणे, विकासातील अनुशेष भरून काढणे, अंधश्रद्धा अनिष्ट रूढींना पायबंद घालणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व बक्षीस योजना राबवणे आणि गौरव करणे, रुग्ण व अपंगांसाठी वैद्यकीय सहाय्यक सहकार्य मदत करणे, संस्थेच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी योग्य त्या मार्गाचा अवलंब करणे. या उद्देशाने समाजातील मान्यवरांनी एकत्र येऊन दि. २४ मे १९९८ रोजी ‘चर्मकार मंच’ही संस्था स्थापन करण्यात आली.
सदर कार्यकारी मंडळाने संस्था नोंदणी अधिनियम १८६० चा अधिनियम २१ व मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था व्यवस्था अधिनियम १९५० चा अधिनियम २९ नुसार ‘चर्मकार मंच’ ही संस्था नोंदणीकृत केली व कार्यक्षेत्र- जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा, डहाणू, पालघर, वसई, शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे व तलासरीसह उंबरगाव या चर्मकार (चांभार) समाजातील गावातील बांधवांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मंचामध्ये संघटित करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. कल्याण येथील जातीय दंगल व राबोडी दंगलग्रस्तांना मदत, पालघर, डहाणू पूरग्रस्तांना मदत, खर्डी येथील दलित युवक हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, वाडा येथील पहिले अधिवेशन, वधु-वर सुचक केंद्र तसेच ठाणे येथील २५ जानेवारी २००९ रोजी द्वितीय अधिवेशन व गुणगौरव सोहळा असे कार्य केले आहे. सदर कार्यकारिणीने ६ मे २०१८ पर्यंत चर्मकार मंचाची धुरा सांभाळली आणि ६ मे २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते पुढील सूत्रे नवीन कार्यकारिणीची सुपूर्द करण्यात आली. विद्यमान कार्यकारिणी खालीलप्रमाणे :-
विद्यमान कार्यकारिणीने विद्या-आरोग्य-संस्कृती-एकता हे ध्येय समोर ठेवून कार्याला सुरुवात केली आहे. आरोग्य तपासणी शिबिर, उमरोळी-पालघर, महिला मेळावा-डहाणू, ज्येष्ठ नागरिक मेळावा-जव्हार व सर्वसाधारण सभा माणिकपूर, वसई अशा प्रकारे सर्वांच्या सहभाग सहकार्याने चर्मकार मंचाचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांची क्षणचित्रे पुढे देत आहोत.
तरी समाजातील सर्व बांधव, सभासद व हितचिंतकांना नम्र विनंती आहे की आपण समाजाच्या एकते प्रति सर्वतोपरी सहभाग सहकार्य द्यावे.